भुईबावडा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) – भुईबावडा घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ही घटना १२ ऑगस्टला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जेसीबीच्या साहाय्याने दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने चालू आहे.

 (सौजन्य : Kokansaad Live) 

भुईबावडा घाटात दरडीचा मोठा भाग रस्त्यावर आला. संपूर्ण रस्ता दरडीच्या ढिगाने व्यापल्याने वाहतूक ठप्प झाली. या मार्गावरील वाहतूक फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली आहे.

करूळ घाटात ४ दिवसापूर्वी संरक्षण कठडा कोसळल्याने मार्ग बंद झाला होता. ११ ऑगस्टपासून या मार्गावरून हलक्या वाहनांना ये-जा करण्यास अनुमती दिली आहे. आता भुईबावडा घाट बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक फोंडाघाट मार्गे वळवण्यात आली आहे.