सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यावरील खड्डे लोकसहभागातून बुजवले !

(प्रतिकात्मक चित्र)

सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाकडे जाणारा रस्ता, तसेच रेल्वेस्थानकाजवळील रस्ता यांवर पडलेले खड्डे अखेर लोक सहभागातून बुजवण्यात आले.

सिंधुदुर्ग रेल्वेस्थानकाकडे जाणार्‍या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी येथील प्रवासी, रिक्शाचालक आणि ग्रामस्थ गेली २ वर्षे वारंवार करत आहेत; परंतु याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अखेर येथील रिक्शाचालक आणि स्थानिक ग्रामस्थ यांनी लोकसहभागातून हे खड्डे बुजवले. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न तूर्तास मिटला असला, तरी या रस्त्यांचे श्री गणेशचतुर्थीपूर्वी तातडीने डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.