महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग जिल्हा धर्मांतराचे केंद्र होत आहे ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

आपल्या देशात आज ७ राज्यांत हिंदू ७ टक्केच राहिले आहेत. आज ‘१००  कोटी हिंदूंचा खात्मा करू’, अशी भाषा वापरणारे औवेसी उघडपणे  फिरत आहेत; पण मुसलमानांचे वास्तव लोकांसमोर ठेवणारे आमदार टी. राजा सिंह मात्र कारागृहात आहेत.

पर्यावरणपूरक जीवनशैली न अंगीकारल्यास हवामानातील पालट अपरिवर्तनीय होईल ! – डॉ. गिरीश जठार, मुंबई

पर्यावरणर तज्ञ आणि संशोधक यांनी औद्योगीकरणाचे कितीही दुष्परिणाम सांगितले, तरी या संदर्भात निर्णय घेणार्‍या राज्यकर्त्यांना पैसा आणि मते यांच्यामुळे त्याची जाणीव होत नाही !

आरे (देवगड जि. सिंधुदुर्ग) येथे राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी घेतली हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा

हिंदु जनजागृती समितीच्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प मासाच्या अंतर्गत आरे गावातील श्री देव आरेश्वर मंदिरानजीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर धर्माभिमानी हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेची  प्रतिज्ञा घेतली.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल्. भारमल ‘आदर्श प्राचार्य’ पुरस्काराने सन्मानित

वर्ष २००८ पासून त्यांनी प्राचार्य पदाचा भार स्वीकारला. आजपर्यंत २ वेळा त्यांनी शिक्षण क्षेत्रात ‘विद्यावाचस्पती’ आणि त्यानंतर एल्.एल्.बी. या पदव्या प्राप्त केल्या आहेत.

देवगड येथील अपघातग्रस्त नौकेतून तेलगळती : सिंधुदुर्गसह गोवा राज्यातील समुद्रकिनार्‍यांना धोका

तेलगळतीच्या पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाकडून ‘ऑईल स्पील डीस्परसंट’ची फवारणी हेलिकॉप्टरमधून करण्यात आली आहे, तसेच येथे स्वच्छता पथकाकडूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

साळेल (मालवण, सिंधुदुर्ग) येथील दुर्लक्षित शिवकालीन विहिरीची ग्रामस्थ आणि शिवप्रेमी यांच्याकडून स्वच्छता

‘विहिरीला गतवैभव प्राप्त करण्यासाठी साळेलवासीय आणि शिवप्रेमी यांनी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. येणार्‍या काळात पर्यटनाच्या माध्यमातून शिवकालीन विहिरीला प्रकाशझोतात आणण्यासाठी ‘पर्यटन व्यावसायिक महासंघ’ पुढाकार घेईल’ !

आंबडपाल येथील श्री मच्छिंद्रनाथ तपोभूमी येथे धर्मप्रेमींना हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा

आजच्या परिस्थितीवर एक मात्र उपाय म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना ! हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी संघटितपणे प्रयत्न करणे हे आपले धर्मकर्तव्य आहे म्हणूनच आज आपण आपल्या कर्तव्यपूर्तीसाठी शपथ घेणार आहोत.

कणकवली (सिंधुदुर्ग) येथे श्री श्री वामनाश्रम स्वामी यांच्या १९ व्या चातुर्मास सोहळ्याची भावपूर्ण वातावरणात सांगता !

वैश्य समाजाचे गुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामीजी यांच्या उपस्थितीत चालू असलेल्या १९ व्या चातुर्मास सोहळ्याची शहरातील गणपति साना येथे गंगापूजनाने सांगता झाली. त्याचा संक्षिप्त वृत्तांत …

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती : जनजीवन विस्कळीत

सध्या भातशेती सिद्ध होण्याच्या टप्प्यात असल्याने शेतीला पावसाची आवश्यकता आहे; मात्र अती पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली, तर  भातशेतीची हानी होण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणारे पोलिसांच्या कह्यात

हॉटेल व्यावसायिक राकेश म्हाडदळकर यांच्या सतर्कतेमुळे बनावट आस्थापनांच्या नावे, तसेच विविध आमिषे दाखवून जिल्ह्यातील अनेकांची लाखो रुपयांची फसवणूक करणार्‍या दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात देण्यात आले आहे.