बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात मालवणमध्ये पर्यावरणप्रेमींचे आंदोलन, तर भाजपचे प्रकल्पाला समर्थन !

‘या प्रकल्पामुळे पर्यावरण धोक्यात येणार आहे’, असे सांगत बारसू येथे या प्रकल्पाला विरोध करणार्‍या ग्रामस्थांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला.

राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेले ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहेत ! – नितेश राणे, आमदार, भाजप

संजय राऊत आणि ठाकरे सेनेला महाराष्ट्रात पाकिस्तानचा ‘अजेंडा’ (धोरण) चालवायचा आहे. ‘माय नेम इज खान’ ला विरोध करणारी शिवसेना आज ‘कश्मीर फाईल्स’, ‘द केरल स्टोरी’ला विरोध करत आहे, कारण या लोकांचा राजकीय ‘लव्ह जिहाद’ झालेला आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर ४ डिसेंबर या दिवशी भारतीय नौसेना दिन साजरा होणार

यावर्षी हा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणार्‍या सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा केला जाणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती !

तिलारी आंतरराज्य धरण प्रकल्प अधिकारी आणि ठेकेदार यांच्यासाठी लाभदायक ! – युवासेना, दोडामार्ग (सिंधुदुर्ग)

दोडामार्ग-तिलारी रस्त्यावरील तीन ठिकाणची कामे गेल्या काही दिवसांपासून चालू आहेत. मोठमोठी यंत्रसामुग्री, असंख्य कामगार आदींच्या साहाय्याने कोट्यवधी रुपयांची कामे वेगात चालू आहेत. त्या तिन्ही ठिकाणच्या कामांची नेमकी आवश्यकता काय ?

सिंधुदुर्ग : सावंतवाडी बसस्थानकाचे काम अनेक वर्षे अपूर्ण असल्याने प्रवासी आणि कर्मचारी यांची असुविधा

‘आर्थिक गर्तेत सापडलेल्या ‘आपल्या’ एस्.टी.ला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे’, अशीच सर्वसामान्यांची भावना आहे. या वृत्तमालिकेच्या माध्यमातून एस्.टी.च्या पुनरुत्थानासाठी चळवळ उभी रहावी, हाच आमचा प्रामाणिक हेतू आहे.

सिंधुदुर्ग : रेडी येथील यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च

एकीकडे शासन यशवंतगडाच्या डागडुजीसाठी साडेपाच कोटी रुपये खर्च करते, तर दुसरीकडे गडाच्या तटबंदीला धोका निर्माण होईल, अशा पद्धतीने अवैधरित्या उत्खनन आणि बांधकाम केले जात असतांना पुरातत्व खाते त्याकडे दुर्लक्ष करते. यात शासनाचा पैसा वाया जाणार नाही का ?

सिंधुदुर्ग : यशवंतगडाजवळ अवैध उत्खनन केल्याच्या प्रकरणी १० जणांना एकूण २६ लाख रुपये दंड !

शिवप्रेमींच्या लढ्याला प्राथमिक यश ! वेंगुर्ला तहसीलदारांची संबंधितांना नोटीस १५ दिवसांत दंड न भरल्यास सक्तीने वसूल करण्याची दिली चेतावणी !

योग्य ज्ञान आणि संस्कार मिळण्यासाठी पुन्हा संयुक्त कुटुंब पद्धतीकडे वळले पाहिजे ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा

कीर्तन हा ईश्वरी भक्तीचा सर्वोत्तम मार्ग आहे. कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी ईश्वरी साधना आणि भक्ती करणे, ही काळाची आवश्यकता आहे. ज्ञानदान हे केवळ शाळेतच नाही, तर मठ, मंदिरे यांतूनही होते, हे आपण दाखवून दिले आहे.

कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाखाली कुडाळ नगरपंचायतीची लाखो रुपयांची उधळपट्टी ! – विलास कुडाळकर, गटनेता, भाजप

या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि तोपर्यंत मोहीम राबवणार्‍या ठेकेदार संस्थेचे देयक देऊ नये, अशी मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केल्याची माहिती नगरपंचायतीचे भाजपचे गटनेता तथा नगरसेवक विलास कुडाळकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग : मनसेच्या पदाधिकार्‍यांनी अचानक केली आंबोली घाटाची पहाणी !

नाक दाबले की, तोंड उघडते, ही म्हण सार्थ करणारी पोलिसांची कारवाई ! मनसेने आवाज उठवण्यापूर्वी पोलिसांना ही अवजड वाहतूक दिसत नव्हती कि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले जात होते ?