सिंधुदुर्ग जिल्‍ह्यातील व्‍यक्‍तीशी स्‍वप्‍नात येऊन मृतात्‍मा बोलला आणि रत्नागिरी जिल्‍ह्यात त्‍याचा मृतदेह सापडला !

वारंवार पडलेल्‍या स्‍वप्‍नांमुळे संबंधित व्‍यक्‍तीने पोलिसांना माहिती दिल्‍यावर पोलिसांनी चौकशी केली असता त्याने सांगितलेल्या परिसरात एका पुरुषाचा कुजलेला मृतदेह सापडला. अशा घटनांविषयी बुद्धीप्रामाण्‍यवाद्यांना काय म्‍हणायचे आहे ?

सिंधुदुर्गातील ४ रेल्वेस्थानकांच्या परिसराचे सुशोभिकरण; मात्र फलाटावर असुविधा !

कोकणात पर्यटनास चालना देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील कोकण रेल्वेच्या स्थानकांना जोडणार्‍या रस्त्यांची दुरुस्ती अन् स्थानकांच्या प्रवेशद्वारासह परिसराचे सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

आज आपण हिंदु म्हणून एकत्र येणे आवश्यक ! – लखमराजे भोसले, युवराज, सावंतवाडी संस्थान

विश्व हिंदु परिषदेच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त परिषदेच्या वतीने ठिकठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. या अंतर्गत सावंतवाडी आणि दोडामार्ग येथे आयोजित संमेलनाला हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी आणि हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : शिल्‍पकार आणि संरचनात्‍मक सल्लागार यांच्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंद !

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्‍याचे प्रकरण
बांधकाम निकृष्‍ट दर्जाचे असल्‍याची टीका

आगामी गणेशोत्सवाच्या कालावधीत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्य, भाजीपाला आणि नाशिवंत साहित्य आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्‍या वाहनांना लागू रहाणार नाही.

कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ सिंधुदुर्गातील वैद्यकीय सेवा २४ घंटे बंद रहाणार

कोलकाता येथील आर्.जी. कर वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर क्रूर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा निषेध म्हणून ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या वतीने १७ ऑगस्टला सकाळी ६ ते १८ ऑगस्टला सकाळी ६ या २४ घंट्यांच्या कालावधीत वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत.

पालकमंत्र्यांच्या जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद : ७८ पैकी ७४ अर्जांचे निराकरण

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात पालकमंत्री रविंद्र चव्हाण, कणकवलीचे आमदार नितेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्यासह प्रमुख अधिकार्‍यांच्या उपस्थितीत हा जनता दरबार झाला.  

उत्तरदायींकडून हा दंड वसूल करा !

‘शैक्षणिक सुविधांचा अभाव आणि शिक्षकांची पुरेशी संख्या नसणे, यांमुळे सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्या सुटण्यासाठी १५ ऑगस्टला उपोषण

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी सोयीसुविधा, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, जलद गाड्यांना थांबा मिळणे यांसह जिल्ह्यातील अनेक रेल्वेस्थानकांवरील विविध समस्या, तसेच अन्य प्रश्न यांकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ते प्रलंबित आहेत.

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील समस्या सोडवा, अन्यथा आंदोलन करणार !

सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या विविध समस्या आणि त्रुटी येत्या महिन्याभरात न सोडवल्यास, तसेच नवीन इमारत अन् वसतीगृह यांचे काम चालू न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल