सिंधुदुर्ग – प्रवासी वाहतूक करणार्या खासगी आराम बसमधून प्रवाशांच्या व्यतिरिक्त अन्य साहित्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे केवळ मालवाहतूक करणार्या व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात हानी होत असल्याने खासगी आराम बसमधून होणार्या मालवाहतुकीला मोठ्या प्रमाणात विरोध होत होता. तसेच मनसेनेही अशा प्रकारे मालवाहतूक करणार्या आराम बसवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्गच्या (आर्.टी.ओ.च्या) वतीने ५ आणि ६ एप्रिल या २ दिवशी एकूण २० आराम बसवर कारवाई करण्यात आली.