संमत निधीची कामे महापालिकेची आचारसंहिता लागण्यापूर्वी संपवा ! – राजेश क्षीरसगार, शिवसेना

अधिकारी नियम मोडून काम करत असत असतील, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करू ! – आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे

औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार करून नव्हे; तर मुसलमानांच्या लांगूलचालनावरून त्यांची भूमिका ठरवणारे राजकीय पक्ष !

औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्याची शिवसेनेची भूमिका आहे; मात्र काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध दर्शवला आहे.

औरंगजेब धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

औरंगजेब हा धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाही, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या माध्यमातून एकप्रकारे त्यांनी संभाजीनगरच्या उल्लेखाचे समर्थनच केले आहे.

नगर येथील केंद्रीय संस्था राज्याबाहेर जाण्याची शक्यता

VRDE संस्था स्थलांतरित केल्यास स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होणार आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्‍न जाणून-बुजून प्रलंबित ठेवण्यात आला आहे ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्याचे नामांतर करावे, अशी मागणी आहे. यावर भाजपने आपली भूमिका स्पष्ट करावी.

१५ वर्षांनंतर प्रथमच शनिशिंगणापूर ग्रामपंचायतीत सदस्यांची निवड बिनविरोध

बाहेरचे राजकारणी दिशाभूल करत असल्याने आम्ही युवक भरकटलो होतो. गडाख यांच्यामुळे नवीन विश्‍वस्त सर्वसमावेशक निवडले आणि ग्रामपंचायतही बिनविरोध झाली, असे नूतन सदस्य बाळासाहेब कुर्‍हाट यांनी सांगितले.

तासगाव येथील नगर वाचन मंदिर चालू करून तेथील अपप्रकार थांबवा ! – शिवसेना तालुका संघटक सचिन चव्हाण यांचे तहसीलदारांना निवेदन

वाचनालय लोकप्रतिनिधींच्या अंतर्गत राजकारणामुळे बंद असून नगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या काही कार्यकर्त्यांनी आपले स्वतःचे कार्यालय चालू केले आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेथे मटका चालू असतो. तरी तेथील अपप्रकार थांबवावेत, या मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे.

अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवावे ! – डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे, उपसभापती, विधान परिषद

मेहबूब शेख हाही पीडित तरुणी आणि तिचे कुटुंबीय यांच्यावर दबाव आणत आहे. त्यामुळे या प्रकरणाचे अन्वेषण वरिष्ठ महिला पोलीस अधिकार्‍याकडे सोपवावे, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. (सौ.) नीलम गोर्‍हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. 

मुंबई सेंट्रल टर्मिनसचे नामांतर ‘नाना शंकरशेठ’ असे करण्याचा प्रस्ताव लवकरात लवकर संमत करावा ! – खासदार अरविंद सावंत, शिवसेना

मुंबई सेंट्रल टर्मिनसला ‘नाना शंकरशेठ’ यांचे नाव देण्याची मागणी फार जुनी आहे.