औरंगाबादच्या नामांतराची भूमिका शिवसेनेची, सरकारची नाही ! – प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा विचार करून नव्हे; तर मुसलमानांच्या लांगूलचालनावरून त्यांची भूमिका ठरवणारे राजकीय पक्ष !

मुंबई – शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या समन्वय समितीमध्ये निर्णय झाल्याविना औरंगाबाद नामांतराचा विषय मंत्रीमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबादचे नामांतर ही शिवसेनेची भूमिका आहे, सरकारची नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी केले. औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ असे करण्याची शिवसेनेची भूमिका आहे; मात्र काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते यांनी औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये नामांतराचा हा विषय वादाचा ठरला आहे.