कोल्हापूर महापालिकेने रंकाळा तलावाची स्वच्छता न केल्यास तीव्र आंदोलन ! – समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कोल्हापूर आयुक्तांना निवेदन

सर्व यंत्रणा हाताशी असणार्‍या महापालिका प्रशासनास रंकाळा तलावाची ही दुरावस्था का दिसत नाही ? त्यासाठी निवेदन का द्यावे लागते ? नागरिकांच्या कररूपातून वेतन घेणारे अधिकारी मग नेमके काय करतात ?

रिक्शाचालकाची आमदार दानवे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार !

आमदार अंबादास दानवे यांनी मारहाण केल्याप्रकरणी रिक्शाचालक अजय जाधव यांनी २९ जून या दिवशी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संभाजीनगर येथे नियम तोडणार्‍या रिक्शाचालकाला आमदार अंबादास दानवे यांनी श्रीमुखात लगावली !

शहरातील क्रांती चौक भागात वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिवसेनेचे आमदार डॉ. अंबादास दानवे रस्त्यावर उतरले. या वेळी नियम तोडणार्‍या रिक्शाचालकाचा बेशिस्तपणा पाहून त्यांनी त्याच्या श्रीमुखात लगावली.

अमरावती येथील शिवसेनेच्या तिवसा शहरप्रमुखांची निर्घृण हत्या !

जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील एका वाईन बार परिसरात २६ जूनच्या रात्री शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील (वय ३४ वर्षे) यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

कोल्हापूरच्या अस्मितेस कोणीही डिवचण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना खपवून घेणार नाही ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

कोल्हापूरच्या स्वागत कमानीवर शिवसेनेकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाचा फलक

उजळाईवाडी (कोल्हापूर) येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या ठिकाणी तेथील स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार द्या ! – शिवसेनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

उजळाईवाडी (कोल्हापूर) येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळाच्या ठिकाणी तेथील स्थानिक भूमीपुत्रांना रोजगार देण्यात यावा, या मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.

संभाजीनगर येथे मराठा आरक्षणावरून शिवसैनिकांनी विनायक मेटे यांची बैठक बंद पाडली !

‘भाजपचे सरकार असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही ?’, असे खडसावत शिवसैनिकांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत येथे २४ जून या दिवशी चालू असलेली बैठक बंद पाडली.

बांधकाम व्यावसायिकाच्या लाभासाठी ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप

आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस पोचले असता या वेळी स्थानिकांकडून जोरदार विरोध करण्यात आला. पोलीस आणि नागरिक यांमध्ये झटापट झाली, तर काही नागरिकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्नही केला.

नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी करत स्थानिकांचा सिडकोच्या कार्यालयाला घेराव !

नवी मुंबई येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्थानिक लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक भूमीपुत्र यांनी २४ जून या दिवशी येथील सिडकोच्या कार्यालयाला घेराव घातला.

शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे, तर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसकडे !

हिंदूंची देवस्थाने भक्तांकडे नव्हेत, तर राजकीय पक्षांच्या कह्यात देणे, हा हिंदु धर्मावरील घोर अन्याय होय. केवळ आर्थिक उत्पन्न देणारी मंदिरे कह्यात घेऊन दूरवस्था झालेल्या मंदिरांकडे दुर्लक्ष करणे, हा तुघलकी प्रकारच आहे