
संभाजीनगर – शहरातील क्रांती चौक भागात वाहतुकीचा खोळंबा झाल्याने वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिवसेनेचे आमदार डॉ. अंबादास दानवे रस्त्यावर उतरले. या वेळी नियम तोडणार्या रिक्शाचालकाचा बेशिस्तपणा पाहून त्यांनी त्याच्या श्रीमुखात लगावली.
आमदार अंबादास दानवेंची बेशिस्त रिक्षाचालकाला मारहाण, क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार https://t.co/JKMrcImImM @iambadasdanve @OfficeofUT @ShivSena @AbadCityPolice #AmbadasDanve #Shivsena #Aurangabad #LodgesComplaint #RickshawPuller
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 29, 2021
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन निर्बंध लागू झाल्यामुळे नागरिक जीवनाश्यक साहित्य घेण्यासाठी बाहेर पडल्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठी गर्दी झाली होती. आमदार डॉ. अंबादास दानवे यांनी रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. दानवे यांच्यासह शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यातच रिक्शाचालकाने बेशिस्तपणे रिक्शा चालवत वाहतुकीस अडथळा निर्माण केला. त्यामुळे दानवे यांनी संतप्त होऊन त्याच्या श्रीमुखात लगावली.
यानंतर वाहतूक पोलिसाने आमदार दानवे यांची समजूत काढत रिक्शाचालकाला पिटाळून लावले. ‘वाहतूक पोलिसांना साहाय्य करण्याची आवश्यकता असतांना अचानक हा प्रकार घडला आहे’, असे आमदार दानवे यांनी सांगितले.
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती