संभाजीनगर – ‘भाजपचे सरकार असतांना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडवला नाही ?’, असे खडसावत शिवसैनिकांनी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या उपस्थितीत येथे २४ जून या दिवशी चालू असलेली बैठक बंद पाडली. काही शिवसैनिक या बैठकीत अचानक आल्याने गदारोळ चालू झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी आक्रमक शिवसैनिकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने संबंधित प्रकार निवळला. यानंतर विनायक मेटे निघून गेले.
मराठा आरक्षण प्रश्न सर्वाेच्च न्यायालयात अवैध ठरल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. भाजपचे सर्वच नेते आणि विनायक मेटे हे या सूत्रावरून राज्य सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी त्यांची बैठक उधळून लावल्याची शक्यता वर्तवली जात आहे.