अमरावती येथील शिवसेनेच्या तिवसा शहरप्रमुखांची निर्घृण हत्या !

राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे !

डावीकडून शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील

अमरावती – जिल्ह्यातील तिवसा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील एका वाईन बार परिसरात २६ जूनच्या रात्री शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील (वय ३४ वर्षे) यांच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात ५ आरोपींचा समावेश असून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर १ जण फरार आहे.

अमोल पाटील हे त्यांच्या मित्रांसमवेत एका बारच्या बाहेर उभे असतांनाच हा प्रकार घडला. या वेळी आरोपींनी त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले. त्या आक्रमणात त्यांचा मृत्यू झाला.

अमोल पाटील यांच्यावर याआधी दोन हत्या केल्याचा आरोप होता. त्यामुळे दीड मासापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी त्यांना जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेशही काढला होता. ही हत्या अवैध धंद्यातून झाली असल्याचे समजते.