बुधगावला (जिल्हा सांगली) प्रतिदिन ५०० कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध व्हावेत ! – शिवसेनेच्या वतीने आरोग्य अधिकारी यांना निवेदन

बुधगावला (जिल्हा सांगली) प्रतिदिन ५०० कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस उपलब्ध व्हावेत, या मागणीचे आरोग्य राज्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन शिवसेनेच्या वतीने आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांना देण्यात आले.

शिवसेनेचे नेते, पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना मतभेद विसरून एक होण्याची हाक

कुणी मंत्रीपदाचा दुरुपयोग करून शिवसेना संपवण्याची भाषा करत असेल, तर ते कदापीही शक्य नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होणार्‍या आर्थिक घोटाळ्यांची चौकशी करा ! – विलास साळसकर, तालुकाप्रमुख, शिवसेना

आर्थिक घोटाळे करणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

‘सनबर्न’सारखे कार्यक्रम राबवण्यासाठी मांद्रे येथे ‘मनोरंजन ग्राम’ प्रकल्पाला मान्यता देण्याचा प्रयत्न झाल्यास स्वस्थ बसणार नाही ! – शिवसेना

नियोजित भूमीत स्थानिकांना अंधारात ठेवून कायदेशीर प्रक्रिया न करताच घिसाडघाईने ‘मनोरंजन ग्राम’ प्रकल्प आणण्याचा प्रयत्न होत आहे.

शिवसेनेच्या वाहन चालक परवाना अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा ! – कुबेर राजपूत, शिवसेना

शिवसेना मिरज तालुक्याच्या वतीने २ आणि ४ चाकी गाड्यांचा परवाना काढण्याचे अभियान मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे.

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांना धमक्या मिळत असल्याने त्यांना सुरक्षा पुरवली जाणार ! – गृहमंत्री

‘इतर मागासवर्गीय (‘ओबीसी’) समाजाला राजकीय आरक्षण मिळावे’, या सूत्रावर अधिवेशनाच्या कालावधीत विधानसभेत ५ जुलै या दिवशी गदारोळ झाला. या गदारोळात भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले.

‘माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहेत !’ – आमदार प्रताप सरनाईक यांची सभागृहात मागणी

मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असून माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहे. त्यामुळे सरकारने मला क्लीन चिट द्यावी, अशी मागणी ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणामुळे कारवाई चालू झालेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या सभागृहात केली.

भाजपच्या प्रतिविधानसभेतील ध्वनीक्षेपक आणि माईक जप्त करण्याचा विधानसभा अध्यक्षांचा आदेश !

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवसही वादळी ठरला. पहिल्या दिवशी अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केल्यानंतर भाजपने विधीमंडळाच्या पायर्‍यावर बसून प्रतिविधानसभा घेतल्याचे पडसाद विधानसभेत उमटले.

भाजप आमदारांचे निलंबन केले हा शिस्तीचाच भाग ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

संजय राऊत म्हणाले, ‘‘विरोधी पक्षाद्वारे महाविकास आघाडी सरकारची एका वेगळ्या पद्धतीने कोंडी करण्याचा प्रयत्न चालू आहे. ते आमच्यावर ‘बॉम्ब’ टाकण्याचा प्रयत्न करत होते; परंतु तो बॉम्ब त्यांच्यावरच फुटला.’’

मुंबई-गोवा महामार्गावर पथकर वसूल न करण्याची शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची मागणी 

खासदार विनायक राऊत जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करत आहेत ! – प्रमोद जठार, माजी आमदार भाजप