कोरोनाच्या संकटात जनआशीर्वाद यात्रा काढणे जनतेसाठी धोकादायक ! – दीपक केसरकर, आमदार, शिवसेना

सिंधुदुर्ग जिल्हा कोरोनाच्या दृष्टीने ‘रेड झोन’मध्ये आहे. अशा कोरोनाच्या संकटकाळात जनआशीर्वाद यात्रा काढून गर्दी जमवणे येथील जनतेच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

सावंतवाडी आणि देवगड येथे भाजप आणि शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद मनाई आदेशाचा भंग केल्याचा ठपका

प्रशासनाच्या मनाई आदेशाचा भंग करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभांचे आयोजन केल्याच्या प्रकरणी सावंतवाडीत काही जणांवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद.

ठाणे येथे शिवसेना विभागप्रमुखावर चाकूने जीवघेणे आक्रमण

एक धर्मांध आणि अन्य २ जण कह्यात. या आक्रमणात अमित हे गंभीररीत्या घायाळ झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. हे आक्रमण करणार्‍या अनिस याच्यावरही जमावाने आक्रमण केल्याने तोही घायाळ झाला आहे.

मालवण येथे ‘दैनिक सामना’च्या प्रती जाळल्याच्या प्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा नोंद

जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या मनाई आदेशाचा भंग करून ‘दैनिक सामना’ या वृत्तपत्राच्या प्रती जाळल्याच्या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सुदेश आचरेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळून एकूण १० ते १२ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांचे विविध ठिकाणी संचलन

शिवसेना आणि भाजप यांच्यातील वादामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच आगामी काळातील सण, उत्सव यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता कायम रहावी, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

नारायण राणे यांना मंत्री करणे, ही भाजपची सर्वांत मोठी चूक होती ! – आमदार दीपक केसरकर, शिवसेना

नारायण राणे यांना मंत्री करणे, ही भाजपची सर्वांत मोठी चूक होती. आतातरी भाजपने ही चूक सुधारावी आणि असे बेताल वागणार्‍या मंत्र्यांना त्यांच्या पदावरून दूर करावे, अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.

सोलापूर येथे शिवसैनिकांकडून नारायण राणे यांच्या प्रतिमेस चपलाहार आणि जोडेमार आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नवीपेठ येथे शिवसैनिक प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे यांनी राणे यांच्या प्रतिमेस चपलाहार घातला

उंचगाव येथे करवीर शिवसेनेच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी उपक्रम

लाभार्थ्यांची परवड होऊ नये म्हणून करवीर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांच्या पुढाकाराने बँक आपल्या दारी या उपक्रमाच्या अंतर्गत उंचगावात १६ लाख रुपयांच्या रकमेचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.

कोरोनाविषयीचे नियम पाळून दहीहंडी उत्सव साजरा करण्याला अनुमती द्यावी ! – आशिष शेलार, भाजप

आशिष शेलार म्हणाले, ‘‘कोरोनाचे नियम पाळून उत्सवाला अनुमती देण्याची विनंती गोविंदा पथकाकडून करण्यात आली होती; मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही विनंती नाकारली. यातून महाविकास आघाडी सरकार तालिबानी संस्कृतीचा परिचय देत आहे का ?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना संगमेश्‍वर येथे अटक : जाणून घ्या सर्व घडामोडी…

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण