सोलापूर – मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी नवीपेठ येथे शिवसैनिक प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर, विजय पुकाळे यांनी राणे यांच्या प्रतिमेस चपलाहार घातला, तसेच येथील सार्वजनिक शौचालयावर मंत्री राणे यांची प्रतिमा चिकटवून त्यांच्या विरोधात घोषणा दिल्या. येथील पार्क चौक येथे युवासेना आणि शिवसेना यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकार्यांनी राणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत राणे पिता-पुत्रांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन केले. गुरुशांत धुत्तरगांवकर आणि गणेश वानकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले.