सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे हा चिंताजनक विषय नाही ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लाखोंचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत असतांना दारू अशा प्रकारे सहजपणे उपलब्ध करून देणे म्हणजे जनतेला दारू पिण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन दिल्याप्रमाणे आहे, असेच जनतेला वाटते !

डॉ. अमोल कोल्हे यांच्या भूमिकेकडे कलाकार म्हणून पाहिले पाहिजे ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

हीच भूमिका अभिनेते शरद पोंक्षे हे जेव्हा नाटकात साकारत होते, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याला का विरोध करत होता ? इतकेच काय तर नाटक बंद पाडण्याचे, धमक्या देण्याचेही प्रयत्न झाले ? या सर्व गोष्टींकडे जनतेने कसे पहायचे ?

‘नथुराम’ आणि पुरोगाम्यांचे अजीर्ण !

या चित्रपटाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांच्या पठडीतील पुरोगामी यांचेही पितळ उघडे पडले आहे. खासदार कोल्हे आणि त्यांच्या पक्षातील पदाधिकार्‍यांना जी सारवासारव करावी लागत आहे, त्याला नियती म्हणतात ! ती आज नाही उद्या तुम्हाला लोळवतेच ! म्हणून नेहमी सत्याची आणि धर्माची कास धरावी !

‘रयत शिक्षण संस्था’ आणि शरद पवार यांना अपमानित करणे टाळा, अन्यथा  राजकारणातून संपाल ! – आमदार शशिकांत शिंदे यांची आमदार महेश शिंदे यांना चेतावणी

आमदार महेश शिंदे समर्थक या चेतावणीला धमकी समजत आहेत. 

देशासमोरील समस्यांवर आपल्यालाच उपाय शोधायचे आहेत ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

देशासमोर अनेक समस्या असून त्या आपल्यालाच सोडवायच्या आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले आहे. शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत  होते.

मराठी भाषेला वैभव प्राप्‍त करून देण्‍यासाठी शासनाने प्रयत्न करावेत ! – शरद पवार, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या समारोपाच्‍या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्‍हणून ते उपस्‍थित होते. स्‍वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान नाशिककर आणि महाराष्‍ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे शरद पवार म्‍हणाले.

आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवानंतर शरद पवार यांची सातारा येथे बैठक

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी ‘राष्ट्रवादी भवना’त दगडफेक केली. यामुळे सातारा येथे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

(म्हणे) ‘महाराष्ट्र, बंगाल आणि केरळ सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न !’ – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस

‘शेती हा देहलीचा नव्हे, तर राज्याचा विषय आहे. आम्ही कृषी विद्यापिठांना विचारून निर्णय घेत होतो’, अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

विदर्भात शेतकर्‍यांचा असंतोष असल्याने शरद पवार यांनी येऊ नये ! – अनिल बोंडे, नेते, भाजप

मी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती केली होती की, येथे शेतकर्‍यांचा असंतोष आहे. त्यामुळे त्यांनी येथे येऊ नये. असंतोष आणि अस्वस्थता त्यांना त्यांच्या नागपूरच्या दौर्‍यात दिसली असेल.

अनिल देशमुख यांचा प्रत्येक दिवस आणि घंटा यांची किंमत आज ना उद्या नक्कीच वसूल होईल ! – शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

अनिल देशमुख यांना कारागृहात टाकले, त्यांच्या प्रत्येक दिवसाची आणि प्रत्येक घंट्याची किंमत आज ना उद्या नक्कीच वसूल होईल – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार