श्री लिंगराज मंदिरातील ‘ध्वनीचित्रिकरण निषिद्ध क्षेत्रा’त चित्रीकरण केल्याने अभिनेत्री रवीना टंडन यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

चित्रपट अभिनेत्री रवीना टंडन यांनी येथील श्री लिंगराज मंदिरातील ‘ध्वनीचित्रिकरण निषिद्ध क्षेत्रा’त ४ मार्चला एका विज्ञापनाचे चित्रीकरण केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.

चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ धर्मादाय विभागाकडे सुपुर्द

कर्नाटकातील चिक्कमगळुरू येथील गुरु दत्तात्रेय बाबा बुडन स्वामी दर्गा यापुढे वक्फ बोर्डाच्या नव्हे, तर धर्मादाय विभागाच्या अधीन असेल, असे राज्य मंत्रीमंडळाने घोषित केले आहे.

२४ परगणा (बंगाल) येथे मंदिरात अज्ञातांनी गोमांस फेकल्याने तणाव

दत्तरपुकूरच्या चलताबेरिया येथे धूलिवंदनाच्या दिवशी अज्ञातांकडून श्री शनिमंदिरात गोमांस फेकण्यात आल्याच्या वृत्तावरून तणाव निर्माण झाला.

महाराष्ट्रात वेद आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वतंत्र मंत्रालय हवे ! – पंडित वसंतराव गाडगीळ

आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये वेद आणि धर्म यांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे. सरकारी व्ययातून या राज्यांमध्ये अनेक उपक्रम चालवले जातात. ‘महाराष्ट्रात मात्र धर्मपासून दूर रहा’, असे सांगणारे लोकच अधिक आहेत.

‘केवळ हिंदु नाहीत; म्हणून तिरुपती देवस्थानातील ख्रिस्ती आणि मुसलमान कर्मचार्‍यांना कामावरून काढू नका !’

केवळ हिंदु नाहीत; म्हणून ख्रिस्ती आणि मुसलमान कर्मचार्‍यांना चाकरीतून काढू नका. पुढील आदेश मिळेपर्यंत ते कर्मचारी तिरुपती देवस्थानात चाकरी करू शकतील, असा आदेश हैद्राबाद उच्च न्यायालयाने तिरुमला तिरुपती देवस्थानला दिला.

श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टकडून जलयुक्त शिवार योजनेसाठी आतापर्यंत ७४ कोटी रुपयांचा निधी संमत ! – आदेश बांदेकर

श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टच्या वतीने जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेसाठी १ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

भ्रष्टाचाराच्या अन्वेषणासाठी शासनाला न्यासाचे पूर्ण सहकार्य राहील ! – आदेश बांदेकर, अध्यक्ष, श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास

श्री सिद्धीविनायक मंदिर न्यास समिती ही शासन नियंत्रित आहे. भ्रष्टाचाराचा विषय हा शासन नियंत्रित आहे. शासनाने त्याविषयी अन्वेषण करावे.

तुळजापूर येथे श्री भवानीदेवीच्या मंदिरात कुंकवाचे हात उमटवण्याची धार्मिक प्रथा गर्दीच्या नावाखाली बंद

येथील श्री भवानीदेवीच्या मंदिरात धार्मिक विधीनंतर ओल्या कुंकवात हात (पंजा) बुडवून त्याचे ठसे (छाप) भाविकांच्या कपड्यावर उमटवण्याची पारंपरिक प्रथा बंद करण्यात आली

बांगलादेशमध्ये श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना

बांगलादेशच्या ठाकुरगाव जिल्ह्यातील जगन्नाथपूर येथे नुकतेच धर्मांधांनी श्री सरस्वती मंदिरावर आक्रमण केले. या वेळी श्री सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केली.

पैठणच्या नाथषष्ठी यात्रा अनुदानात नगर परिषदेकडून भ्रष्टाचार झाल्याचे उघड

येथील नाथषष्ठी यात्रेसाठी पैठण नगर परिषदेला उपलब्ध झालेल्या १ कोटी २५ लाख रुपयांच्या शासकीय अनुदानात भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले आहे.


Multi Language |Offline reading | PDF