मुसलमान शासक ते आताचे भारतीय नेते यांनी हिंदू आणि हिंदूंची मंदिरे यांची केलेली दैन्‍यावस्‍था !

‘मुसलमान शासनकर्त्‍यांनी आमची मंदिरे फोडली, शास्‍त्रग्रंथ जाळले. त्‍याने काही फारसे बिघडले नाही. आम्‍ही नवी मंदिरे बांधली. शास्‍त्रग्रंथ कंठस्‍थ केले. आमची मने जिवंत होती. कारावासाच्‍या भिंती फोडून आम्‍ही बाहेर आलो. आम्‍ही आमच्‍यात हीनगंडाला रतिमात्र थारा दिला नाही. इंग्रजांनी मंदिरे फोडली नाहीत; पण मंदिरात जाण्‍याची श्रद्धाच नाहीशी करून टाकली. वेदशास्‍त्रादी प्राचीन ग्रंथांविषयी त्‍यांनी हीनगंड जोपासला. त्‍या पराभूत मनोवृत्तीचे संवर्धन केले.

‘ब्रिटिशांनीच राज्‍य करावे आणि त्‍यांचे गुलाम रहाण्‍यातच आमचे कल्‍याण आहे’, असे भारताचे अग्रणी त्‍या काळी सांगायचे आणि तसे वागायचे. वास्‍तविक आम्‍ही जोपासलेल्‍या आमच्‍या श्रेष्‍ठतम संस्‍कृतीच्‍या वारशाच्‍या बळावर, आमचे स्‍वातंत्र्य प्रेम आणि राष्‍ट्रनिष्‍ठा यांच्‍या ज्‍वलंत अस्‍मितेच्‍या मनोबलामुळे, ब्रिटिशांना हे भारताचे गिळलेले माणिक ओकावे लागले. ब्रिटिशांनी आमचे स्‍वत्‍व आणि आमची अस्‍मिता नष्‍ट करण्‍याची कसोशी (प्रयत्न) केली. तरीही काही निखारे धगधगत राहिले. स्‍वातंत्र्यानंतर जे काही थोडे फार निखारे होते, ते आमच्‍या नेत्‍यांनी विझवून टाकले. आम्‍हाला बैल बनवले.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२२)