बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘शिष्याची ज्ञानलालसा खरी नसेल, तर त्याची गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा बसत नाही. वार्‍याच्या झुळकीसरशी उडणार्‍या गवताच्या काडीप्रमाणे गुरूंच्या ठिकाणी जर मतलबी श्रद्धा असेल…

जेजुरीच्या खंडोबा गडावर शंकराचार्यांच्या हस्ते घटस्थापना !

जेजुरीच्या खंडोबा गडावर १३ डिसेंबर या दिवशी करवीर पिठाचे शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात सकाळी साडेअकरा वाजता गडामधील नवरात्र महालात श्री खंडोबा म्हाळसादेवींच्या मूर्ती आणून वेदमंत्राच्या जयघोषात घटस्थापना करण्यात आली.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘वास्तविक शाश्वत सुखप्राप्तीसाठी विशेष काही करावयास नको. फक्त देवाप्रीत्यर्थ जे काही करतो, ते निष्कामपणे घडले, म्हणजे झाले

ठाणे येथील योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचे सुपुत्र पू. शरदकाका वैशंपायन यांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

३ डिसेंबर या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी एका अनौपचारिक भावसोहळ्यात पू. शरदकाका यांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला. सद्गुरु डॉ. गाडगीळ यांनी ‘तुमच्या रूपात प्रत्यक्ष योगतज्ञ प.पू. दादाजी आले आहेत’, असे पू. शरद काका यांना भावपूर्ण निवेदन केले.

Ram Mandir Ayodhya : रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी ४ सहस्र संत-महंतांना पाठवण्यात आले निमंत्रण !

रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सव २२ जानेवारी २०२४ या  दिवशी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मंगल सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने देशभरातील ४ सहस्रांहून अधिक संत-महंतांना निमंत्रणे देण्यात येत आहेत.

शरीरात प्राण असेपर्यंत मठ-मंदिरे आणि सनातन धर्मरक्षणाचा प्रण घ्या ! – महंत सुधीरदासजी महाराज, काळाराम मंदिर, नाशिक

ओझर (पुणे) येथे राज्यस्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेला प्रारंभ ! मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी राज्यभरातील ५५० हून अधिक विश्‍वस्त एकवटले ! ओझर (जिल्हा पुणे), २ डिसेंबर (वार्ता.) – धर्म आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी संघर्ष करा. छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत. त्यांनी आपल्याला धर्मासाठी झुंजण्याची वृत्ती दिली. ८ लाखांचे सैन्य घेऊन महाराष्ट्रात शिरलेल्या औरंगजेबाला … Read more

पैठण येथे ४५० वर्षांनंतर श्री संत एकनाथ महाराजांच्या हस्ताक्षरातील एकनाथी भागवत गीतेची हत्तीवरून मिरवणूक !

शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराज समाधी चतु:शतकोत्तर सुवर्णमहोत्सव तथा ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत जयंती महोत्सवानिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि पारायण सोहळा याची २७ नोव्हेंबर या दिवशी येथे सांगता झाली.

पैठण येथील सोहळ्यात प.पू. शांतिगिरी महाराजांना ‘महाभागवत’ उपाधी प्रदान ! 

शांतिब्रह्म संतश्रेष्ठ श्री एकनाथ महाराज समाधी चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सव तथा ग्रंथ कौस्तुभ एकनाथी भागवत जयंती सुवर्ण महोत्सव निमित्त श्रीक्षेत्र पैठण येथे २२ नोव्हेंबर या दिवशी ‘अखंड हरिनाम सप्ताह सोहळा’ आयोजित करण्यात आला होता.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्‍या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील शास्‍त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘संतांना स्‍वतःची निंदा ऐकून आनंद होतो. जनांना स्‍वतःची स्‍तुती ऐकून आनंद होतो. संत नेहमी स्‍वतःचे दोष पहात असतात. जन नेहमी दुसर्‍याचे दोष पहात असतात. संत हृदयात असेल, ते बोलून टाकतात; म्‍हणून त्‍यांच्‍या जवळ केव्‍हाही समाधान नांदते.

२६ ऑक्‍टोबर २०२३ ते २६ ऑक्‍टोबर २०२४ या कालावधीत साजरा होत आहे जन्‍मशताब्‍दी महोत्‍सव !

या निमित्ताने इंदूर येथे मासाच्‍या प्रत्‍येक रविवारी भाजी-पुरी (बालभोग) वाटप आणि मोरटक्‍का येथील नर्मदातीरावर अमावास्‍येला भाजी-पुरी (बालभोग) वाटप करण्‍यात येणार आहे. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तारक मंत्राचा १३ लाख जप लिखित स्‍वरूपात करण्‍याचे ठरवण्‍यात आले आहे.