रामनाथी (गोवा) – मूळचे फरिदाबाद (हरियाणा) येथील आणि सध्या रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात वास्तव्यास असलेले सनातनचे ४६ वे संत पू. भगवंत कुमार मेनराय यांनी ४ जून २०२४ या दिवशी सायंकाळी ७.१५ वाजता देहत्याग केला. त्यांच्या पश्चात ३ मुली, २ जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. पू. (कै.) सौ. सूरजकांता मेनराय (सनातनच्या ४५ व्या संत) यांचे ते पती होते. पू. भगवंत मेनराय यांच्या कन्या सुश्री (कु.) संगीता मेनराय या रामनाथी येथील सनातन संस्थेच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करत आहेत.