संत केवळ स्वतःच्या साधनामार्गातील साधकालाच शिष्य म्हणून स्वीकारतात !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘अनेक संतांच्या चरित्रामध्ये आपण वाचतो की, ते साधनेच्या प्रारंभीच्या काळात गुरूंच्या शोधात अनेक संतांना भेटले; पण त्या संतांनी त्यांना सांगितले, ‘मी तुझा गुरु नाही.’ याचे मूळ कारण म्हणजे, संत त्यांच्याकडे साधना शिकण्यासाठी येणार्‍या प्रत्येकालाच शिष्य म्हणून स्वीकारत नाहीत. आलेल्या साधकाला स्वतःच्या मार्गाची साधना उपयुक्त आहे कि नाही, हे बघूनच ‘त्याला शिष्य म्हणून स्वीकारायचे कि नाही’, हे ते संत ठरवतात. याउलट सनातनमध्ये येणार्‍या प्रत्येक साधकाला ‘त्याला आवश्यक ती साधना’ सांगण्यात येते.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले