पिंपरी (जिल्हा पुणे) – मावळ तालुक्यात असलेल्या ‘तुंग किल्ला’ उपाख्य ‘कठिण गडा’च्या संवर्धनासाठी ‘महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागा’कडून १ कोटी ५६ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या निधीतून ‘तुंग’ गडाच्या संवर्धनाची विविध कामे करण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे सचिन शेडगे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणार्या या ‘तुंग’ गडाची अनेक वर्षांपासून झालेली पडझड आणि पायर्यांची झीज यांमुळे गडावर सहज जाणे शक्य होत नाही; परंतु ३ वर्षांपासून ‘सह्याद्री मावळ प्रतिष्ठान’कडून या गडाच्या संवर्धनाचे कार्य चालू आहे. त्यांच्या या कार्याची नोंद घेत आणि गड तुंग दुर्गसंवर्धन प्रकल्प अहवालानुसार हा निधी संमत केला आहे.