हिंदु जनजागृती समिती आयोजित पुणे येथे ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ मोहीम !

मोहिमेच्या अंतर्गत व्याख्यान, तसेच पुणे येथील मल्हार गडाची स्‍वच्‍छता आणि संवर्धन !

स्वसंरक्षणवर्गात सहभागी धर्माभिमानी

सासवड (जिल्हा पुणे), १८ मार्च (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुणे शहराजवळील सासवड या गावानजिक असलेल्या मल्हार गडावर १७ मार्चला ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’ ही मोहीम आयोजित करण्यात आली होती. मल्हार गडावर सर्वांनी भगवान महादेवाच्या चरणी प्रार्थना आणि भगवान शिवाचा सामूहिक नामजप करून मोहिमेला प्रारंभ केला.

व्याख्यानात विषय समजून घेतांना धर्माभिमानी

या मोहिमेच्या अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, तसेच धर्माभिमानी आणि रणरागिणी यांनी उत्स्फूर्तपणे गडाची स्वच्छताही केली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दीपक आगावणे आणि श्री. श्रीकांत बोराटे यांनी ‘धर्मकार्यासाठी छत्रपती शिवरायांचे गुण स्वतःमध्ये विकसित करण्याचे महत्त्व’ आणि ‘धर्मकार्यासाठी आध्यात्मिक बळाचे आणि गुरूंचे महत्त्व’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.

गड परिसराची स्वच्छता करतांना धर्माभिमानी

भोर, सासवड,बारामती, चिंचवड, तळेगाव, पुणे शहर या भागांतून धर्मप्रेमी आले होते. उपस्थित सर्व धर्माभिमान्यांना गडाची माहिती सांगण्यात आली, तसेच धर्माभिमान्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षणही देण्यात आले. हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन सर्व मावळे हिंदु राष्ट्रासाठी कटीबद्ध झाले.