नामजप आणि यज्ञ

‘नामजप आणि मंत्रजप करणे या व्यष्टी साधना आहेत, तर यज्ञ करणे ही समष्टी साधना आहे.

अडचणींकडे पहायचा दृष्टीकोन !

‘पूर्णतेच्या मार्गाने ज्याला वाटचाल करायची आहे, त्याला अडचणी येणारच. त्याने त्याविषयी कधी तक्रार करू नये.

विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधकांनो, विवाहाच्या संदर्भात विचार मनात येत असल्यास पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !

विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधक आणि साधिका यांच्यासाठी ती सूत्रे मार्गदर्शक ठरतील !

जलद आनंदप्राप्तीसाठी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ करा !

‘गुरुकृपायोगानुसार साधना’ म्हणजे व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा सुयोग्य समन्वय !

ज्ञानीच वैकुंठाचे मोल जाणू शकणे

‘तुकाराम महाराज आवडीला (पत्नीला) वैकुंठाला नेणार होते. तेव्हा आवडी म्हणाली, ‘‘जावा तुम्ही. माझ्या म्हशीचे कोण करणार ?’’

विश्‍वविद्यालयात आत्मज्ञानाविषयी चर्चा होणे आवश्यक !

ज्या लोकांचा आत्म्यावर विश्‍वास नाही, ते लोक अत्यंत दुर्दैवी दशेत आहेत. आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत ? याचे ज्ञान नसते. आत्मज्ञान हे सर्वांत महत्त्वाचे ज्ञान आहे; पण त्या ज्ञानाची चर्चा कोणत्याही विश्‍वविद्यालयात होत नाही

३०.११.२०२० या दिवशी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण !

‘कार्तिक पौर्णिमा, सोमवार, ३०.११.२०२० या दिवशी होणारे चंद्रग्रहण हे ‘छायाकल्प’ स्वरूपाचे असणार आहे. हे छायाकल्प चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार नसून पूर्व भारतातही ‘छायाकल्प’ स्वरूपातच दिसणार आहे. छायाकल्प ग्रहणाचे कोणतेही वेधादी नियम पाळू नयेत.’

ईश्‍वराला जाणून घेतल्याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्य !

आपण सुखासमाधानात रहावे; परंतु त्याच वेळी आपण कृष्णभावात किंवा ईश्‍वरभावात असावे, त्यामुळे आपण सुखी होऊ. ईश्‍वराला जाणून घेतल्याविना आणि ईश्‍वराशी भावातीत झाल्याविना खरी शांती अन् सुख मिळण्याची शक्यता नाही.

आध्यात्मिक विकास, हाच समर्पक विकास !

मानवी जीवनाचा खरा दृष्टीकोन म्हणजे आध्यात्मिक दृष्टीकोन आहे आणि तो समजून घेण्याचा प्रयत्न करा.

मनुष्याला आध्यात्मिक साक्षात्कार झाल्यास तो खर्‍या अर्थी सुखी होणे

‘जेव्हा ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे, मी हे शरीर नाही, तर मी दिव्य आत्मा आहे, परब्रह्माचा दिव्य अंश आहे’, असे मनुष्याला कळते, तेव्हा त्याला ‘ब्रह्मानुभव’ म्हणतात. असा ब्रह्मानुभव होताच मनुष्य सुखी होतो.