ज्या लोकांचा आत्म्यावर विश्वास नाही, ते लोक अत्यंत दुर्दैवी दशेत आहेत. आपण कुठून आलो आणि कुठे जाणार आहोत ? याचे ज्ञान नसते. आत्मज्ञान हे सर्वांत महत्त्वाचे ज्ञान आहे; पण त्या ज्ञानाची चर्चा कोणत्याही विश्वविद्यालयात होत नाही; पण या शरिराची रचना कशी आहे ? मृत आणि जिवंत शरीर यांत भेद कोणता आहे ? शरीर जिवंत का आणि कसे रहाते ? शरिराची स्थिती कोणती आहे आणि शरिराचे महत्त्व काय आहे ? या प्रश्नांचा सध्या कुणीही अभ्यास करत नाही. – स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद (संदर्भ : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान) |