‘जेव्हा ‘अहं ब्रह्मास्मि’ म्हणजे, मी हे शरीर नाही, तर मी दिव्य आत्मा आहे, परब्रह्माचा दिव्य अंश आहे’, असे मनुष्याला कळते, तेव्हा त्याला ‘ब्रह्मानुभव’ म्हणतात. असा ब्रह्मानुभव होताच मनुष्य सुखी होतो. जेव्हा मनुष्याला ‘ब्रह्मानुभव’ येतो, आध्यात्मिक साक्षात्कार होतो, तेव्हा त्याला मोह, लोभ, शोक होत नाही. आज सारे जग केवळ मोहग्रस्त, लोभग्रस्त आणि शोकग्रस्त झाले आहे. ज्या गोष्टी आपल्यापाशी नाहीत, त्यांचा आपण हव्यास धरत आहोत आणि ज्या गोष्टी आपण गमावल्या आहेत, त्याविषयी आपण शोक करत आहोत. असा आहे आपला संसारिक उद्योग; पण जर आपल्याला कळले की, आपण परब्रह्माचे अंश आहोत, ब्रह्म आहोत, तर मग आपण मोहातीत, लोभातीत आणि शोकातीत होऊ.
– स्वामी श्रील भक्तीवेदांत प्रभुपाद (संदर्भ : आत्मसाक्षात्काराचे विज्ञान)