गुरुपौर्णिमेला ३४ दिवस शिल्लक
नामावर श्रद्धा ठेवा. नाम हाच तुमचा गुरु आहे. नामच तुम्हाला मार्ग दाखवील ! – प.पू. भक्तराज महाराज
नामावर श्रद्धा ठेवा. नाम हाच तुमचा गुरु आहे. नामच तुम्हाला मार्ग दाखवील ! – प.पू. भक्तराज महाराज
कार्यानुमेय सिद्धींच्या वापराची आवश्यकता असल्यास गुरु त्या त्या वेळी सिद्धी उपलब्ध करून देतात.
‘मुलाने आणि काही इतरांनी कसे चालावे ? बोलावे ? आणि वागावे ? हे त्यांचे आई-वडील किंवा हितचिंतक त्यांना शिकवतात; पण ‘ते कृतीत कसे आणावे ?’, हे ते शिकवत नाहीत. ते सनातन संस्था शिकवते.’
‘कलियुगामध्ये परात्पर गुरुदेवांचे (डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे) अवतारी तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. साधकांनी याचा लाभ करून घ्यायला हवा. कलियुगात साधनेचा ‘संधीकाळ’ म्हणतात, तो हाच आहे.’
‘अनुकूल काळात नव्हे, तर प्रतिकूल काळातच साधकाच्या साधनेची खरी परीक्षा होते. आपत्कालीन स्थितीत आत्मपरीक्षण करण्याची नामी संधी असते. ‘अशा काळात आपली मनःस्थिती कशी आहे ? प्रतिकूलतेला सामोरे जाण्याची मनाची कितपत सिद्धता आहे ?’, याचे चिंतन करता येते.
निरनिराळ्या योगमार्गांनी साधना करण्यात कित्येक वर्षे फुकट न घालवता, म्हणजे या सर्व मार्गांना डावलून, ते ‘गुरुकृपा लवकर प्राप्त कशी करायची ?’ ते गुरुकृपायोगात साधक शिकतो. त्यामुळे साहजिकच या मार्गाने जलद उन्नती होते.
कासवी जशी केवळ दृष्टीमात्र पिल्लांचे पोषण करते, तद्वत् गुरु केवळ कृपावलोकनाने शिष्याचा उद्धार करतात.
गुरूंना अंतर्ज्ञानाने सर्वकाही समजते, या अनुभूतीमुळे शिष्य वाईट कृत्ये करणे बर्याचदा टाळतो.