गुरुपौर्णिमेला २१ दिवस शिल्लक
मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.
मंद प्रारब्ध भोगण्याची क्षमता मध्यम साधनेने, मध्यम प्रारब्ध भोगण्याची क्षमता तीव्र साधनेने, तर तीव्र प्रारब्ध भोगण्याची क्षमता केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते.
चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.
गुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.
गुरु शिष्याचे भोग टाळीत नाहीत; पण भोग भोगत असतांना ते त्याचे समाधान टिकवतात !
गुरु आपल्या डोळ्यांतून, शब्दांतून किंवा स्पर्शाने कृपेचा ओघ बुद्धीपुरस्सर भक्ताकडे लावतात. ही कृपा शिष्याला गुरूंच्या प्रयत्नाने दिलेली असते.
श्रीगुरूंच्या अनुग्रह शक्तीलाच गुरुपद म्हणतात. ते उपेय आहे, म्हणजेच उपायांच्या सहयोगाने त्याची प्राप्ती होते; परंतु श्रीगुरु हेच प्रत्यक्ष उपाय आहेत !
दुसर्यांवरील अवलंबित्व कमी केल्याने टप्प्याटप्प्याने मायेतून सुटत जाण्यास साहाय्य होणे
सहजध्यान चालू करण्याकरता गुरूंची आवश्यकता भासते; कारण केवळ त्यांचीच अंतःस्थिती उच्च कोटीची असते. गुरूंमुळे चालू झालेले हे सहजध्यानच शेवटी योग्याला पूर्णत्व प्राप्त करून देऊ शकते.
एक बद्ध जीव दुसर्या बद्ध जीवाचा उद्धार करू शकत नाही. गुरु मुक्त असल्यानेच शिष्यांचा उद्धार करू शकतात !
गुरु ज्याच्यावर कृपा करतात, त्याचे तन, मन, धन, सुख, दु:ख, अहं इत्यादी सर्व हरण करतात.