कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी, तसेच आपल्याला आध्यात्मिक बळ मिळावे, यांसाठीचा ध्वनीमुद्रित नवीन नामजप उपलब्ध !

सध्या कोरोना विषाणूंचा संसर्ग जगभर होत आहे. सर्वत्र हाहा:कार माजला आहे. आतापर्यंत यामुळे लक्षावधी लोक मृत्यूमुखी पडले आहेत. जगावर ओढवलेल्या या संकटाविषयी शारीरिक आणि मानसिक या स्तरांवरील वैद्यकीय उपचारांसमवेतच व्यक्तीचे आध्यात्मिक बळ वाढवणेही आवश्यक आहे. यासाठी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी कोरोना विषाणूंविरुद्ध आपल्यात प्रतिकारक्षमता निर्माण होण्यासाठी वैद्यकीय सल्ला आणि उपचार यांसमवेतच आध्यात्मिक बळ वाढावे, म्हणून ३ देवतातत्त्वांच्या ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करण्यास सांगितला आहे.

हा नामजप आता नव्याने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार विश्वविद्यालयाच्या संगीत समन्वयक कु. तेजल पात्रीकर यांच्या आवाजात सिद्ध करण्यात आला आहे. हा नामजप सनातनच्या संकेतस्थळावर, तसेच ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

खालील QR code स्कॅन करूनही ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲप डाऊनलोड करू शकता.

हे नामजप ऐकतांना आपणांस काही वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती आल्यास [email protected] या ई-मेल पत्त्यावर अवश्य कळवा.