
‘नंदुरबार येथील साधिका सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेले भावविश्व’ या संदर्भातील लेख २४.८.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पृष्ठ ६ वर प्रसिद्ध केला आहे. देवतांचा नामजप करतांना सौ. निवेदिता जोशी यांनी अनुभवलेला भाव अवर्णनीय आहे. त्यांनी वर्णन केलेले भावविश्व वाचकालाही सहजतेने अनुभवता येतील, इतका तो लेख अप्रतिम आहे. असा भावपूर्ण लेख आजपर्यंत कुणीच लिहिलेला नाही. या सुंदर लेखाबद्दल सौ. निवेदिता जोशी यांचे अभिनंदन ! ‘सर्वत्रच्या साधकांना शिकण्यासाठी त्या अशा प्रकारचे सुंदर लेख यापुढेही पाठवतील’, अशी मला आशा वाटते.
बर्याच साधकांना नामजप करतांना ग्लानी येणे, अन्य विचारांमध्ये वहावत गेल्याने नामजपात खंड पडणे, अशा प्रकारचे त्रास होत असतात. त्यांनीही सौ. जोशी यांच्याप्रमाणे प्रयत्न केल्यास त्यांना नामजपाचा पूर्ण लाभ होईल !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
(सौ. निवेदिता जोशी यांचा लेख १ वर्ष विलंबाने प्रसिद्ध केल्याबद्दल क्षमस्व ! – संपादक)
बाह्य आणि अंतर्गत शत्रू असलेला एकमेव देश, ‘भारत’ !
स्वतःमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
कठीण वाटणारी निष्काम साधना साधकांना सहजतेने करायला शिकवणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न, तसेच पुढे ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जाणे’, यांमागील कारणे