गुरुपौर्णिमेला ४१ दिवस शिल्लक
गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.
गुरु सांगतात तसे शिष्य करतो; म्हणून त्याला निर्गुणाचे ज्ञान होते. भक्त सांगतो ते ईश्वर करतो, म्हणजे सगुणात येतो आणि भक्ताला दर्शन देतो.
‘गुरु विश्वासावर आहे. आपल्या विश्वासावर गुरूंची महती अवलंबून आहे. गुरु तुमच्यापण विश्वासावर आहे. तुमच्या विश्वासातच गुरु आहे.
अध्यात्मप्रसार ही गुरूंच्या निर्गुण-रूपाची सेवा आहे. ही गुरुकृपेसाठी ७० टक्के महत्त्वाची आहे, तर गुरूंच्या सगुणरूपाची सेवा ही ३० टक्के महत्त्वाची आहे. पूर्ण गुरुकृपेसाठी दोन्ही करणे आवश्यक आहे.
तीव्र मुमुक्षुत्व किंवा गुरुप्राप्तीची तीव्र तळमळ या एका गुणामुळे गुरुप्राप्ती लवकर होते आणि गुरुकृपा सातत्याने रहाते.
गुरु हे २४ घंटे शब्द आणि शब्दातीत अशा दोन्ही माध्यमांतून शिष्यास सतत मार्गदर्शन करत असतात. गुरु हे कोणत्याही संकटातून शिष्याला तारतात.
परीस जसा स्पर्शमात्रे लोहाला सुवर्ण बनवतो, त्याप्रमाणे गुरु केवळ करस्पर्शाने साधकाला दिव्यज्ञान देतात.
कृपा हा शब्द कृप् या धातूपासून तयार होतो. कृप् म्हणजे दया करणे आणि कृपा म्हणजे दया, करुणा, अनुग्रह किंवा प्रसाद. गुरुकृपेच्या माध्यमातून जीव शिवाशी जोडला जाणे, याला गुरुकृपायोग असे म्हणतात.
केवळ स्वतःच्या परिवारापुरताच विचार न करता समाजबांधवांचा विचार करून मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करावी.
गुरु स्वतःतील ‘गुरु’पणामुळे शिष्याला त्याच्यातील लघुपणाचा न्यूनगंड वाटू न देता, त्याचा न्यूनगंड काढून त्याला ‘गुरु’पद प्राप्त करून देतात.