समाजात कसेही वागून ‘गुरु’ शब्दाची अपकीर्ती करणारे काही तथाकथित ‘गुरु’ !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘अध्यात्माविषयी थोडे फार कळू लागले की, काही जण स्वतःला ‘गुरु’ म्हणवून घेऊ लागतात. स्वतःचे पांडित्य लोकांना दाखवून स्वतःभोवती शिष्यपरिवाराचा गोतावळा निर्माण करतात. एका टप्प्याला स्वतःला ‘सर्वज्ञानी’ समजून ते कसेही वागू लागतात; परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की, स्वतः ‘गुरु’पदासाठी पात्र नसतांना तसे करून ते ‘गुरु’पदाला अपकीर्त करत आहेत. त्यांच्यामुळे त्यांची स्वतःची हानी होतेच, त्याचबरोबर त्यांच्या शिष्य परिवाराचीही हानी होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले