सनातनमध्ये ‘मी केले’, असे काहीच नसणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘काही आध्यात्मिक संस्था किंवा संप्रदाय यांनी कोणतेही उपक्रम राबवले वा कार्यक्रम केले की, ‘आम्ही हे केले, आम्ही ते केले’, असे सांगतांना दिसतात; मात्र सनातनमध्ये सर्व कार्य महर्षि, संत आदींच्या, म्हणजे देवाच्या मार्गदर्शनानुसार केले जाते. त्यामुळे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘…..यांनी सांगितल्याप्रमाणे केले’, असा उल्लेख असतो. कर्तेपणा स्वतःकडे न घेण्यासाठी असे नसते, तर ती वस्तूस्थिती असते. याचाच दुसरा पैलू म्हणजे स्वतःचा मोठेपणा दाखवण्याची धडपड नसल्यामुळे ‘स्वतः काही केले नाही’, याचा न्यूनगंडही वाटत नाही, उलट आज्ञापालन केल्याचा आनंदच वाटतो. सनातन संस्थेने राबवलेल्या एखाद्या उपक्रमाचा उल्लेख काही बातम्यांत केला जातो. तेही केवळ अशा उपक्रमांच्या माध्यमांतूनही साधना करता येऊ शकते, हे समाजासमोर उदाहरण ठेवण्याचे एक माध्यम असते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले