जळगावच्‍या हिंदु एकता दिंडीत भक्‍ती आणि शौर्य यांचा संगम !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ८१ व्‍या जन्‍मोत्‍सवाच्‍या निमित्ताने २७ मे या दिवशी सायंकाळी ५ वाजता शहरात ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्‍यात आले होते.

आज : सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांचा ७१ वा वाढदिवस आहे.

सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांना ७१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

सकारात्मक राहून प्रसंगातून शिकणारे आणि अभ्यासपूर्ण सेवा करणारे ऋषितुल्य सद्गुरु नंदकुमार जाधव (वय ७१ वर्षे) !

उद्या ज्येष्ठ शुक्ल अष्टमी (२८.५.२०२३) या दिवशी सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त श्री. प्रशांत जुवेकर आणि अन्य साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

सद्गुरु काका, साधना करतो आम्ही तुमच्या कृपेने ।

सारा प्रवास होता मायेच्या अंधारात । साधनेचा प्रकाश मिळाला, तुमच्या कृपेने ।

जळगाव सेवाकेंद्रात असलेल्या गुरुपादुकांमधील चैतन्याची आलेली प्रचीती !

‘कोरोनाची तीव्रता वाढत होती. त्या काळात जळगाव येथील एका आस्थापनाने त्यांच्या काही कर्मचार्‍यांना समाजातील व्यक्तींतील प्राणवायूची (ऑक्सिजनची) पातळी आणि शारीरिक तापमान मोजण्याची सेवा दिली होती. एकदा ते कर्मचारी सनातनच्या जळगाव सेवाकेंद्रात साधकांची तपासणी करण्यासाठी आले होते.

सगुणातील सद्गुरु माऊली नंदकुमार जाधवकाका ।

सगुणातील गुरुमूर्ती तू सद्गुरु माऊली । आनंदमाचा सागर तू सद्गुरु माऊली ।।

प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात नगर येथील सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नगर येथील पेमराज सारडा महाविद्यालयाच्या सभागृहात नुकत्याच झालेल्या ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’चे आयोजन करण्यात आले.

महानुभाव पंथाचे मी आणि सर्व साधक सनातन हिंदु धर्मासाठी साहाय्य करण्यास कटीबद्ध आहोत ! – सुदर्शन महाराज कपाटे, महानुभाव पंथ

अधिवेशनाचे उद्घाटन महानुभाव पंथाचे सुदर्शन महाराज कपाटे, सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव आणि हिंदु विधीज्ञ परिषदेचे पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हेही उपस्थित होते.

पुढच्या पिढीच्या अस्तित्वासाठी हिंदु राष्ट्र स्थापन करणे आवश्यक ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

ज्याप्रमाणे हिंदुत्वाची चळवळ वाढत आहे, त्याचप्रमाणे हिंदुविरोधी कारवाया वाढत आहेत. आज देशात बहुसंख्य हिंदू असतांना आपण धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. पोलिसांच्या समक्ष ‘सर तन से जुदा’ असे गाणे वाजवले जाते.

महाराष्‍ट्रात तात्‍काळ धर्मांतरबंदी कायदा करा ! – सुनील घनवट, महाराष्‍ट्र आणि छत्तीसगड राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंच्‍या राष्‍ट्रकार्याला होणारा विरोध करण्‍याचे धैर्य समाजकंटकांना होणे, हे हिंदुत्‍वनिष्‍ठ शासनाच्‍या काळात अपेक्षित नाही !