सनातन धर्म कर्तव्यांशी संबंधित धर्म !

सद्गुरु नंदकुमार जाधव

‘सनातन धर्म हा केवळ पूजा-परंपरेशी संबंधित नाही, तर कर्म-कर्तव्यांशीही संबंधित आहे. गृहस्थ व्यक्तीसाठी वृद्ध माता-पित्याची सेवा आणि अपत्यांचा सांभाळ हा गृहस्थ धर्म आहे. दुकानदारांसाठी ग्राहकहित, डॉक्टरांसाठी रुग्णांचे स्वास्थ्यरक्षण हा धर्म आहे. हा धर्म शाश्वत आहे; कारण तो जगभरात एकच आहे अन् १०० वर्षांपूर्वी आणि १०० वर्षांनंतरही हेच कर्तव्य कर्म कायम रहाणार आहे. थोडक्यात सनातन धर्म स्थळ, काळ बंधन नसलेला चिरंतन असा आहे. त्याला नष्ट करणे, म्हणजे अराजक उत्पन्न करण्याप्रमाणे आहे.’

–  सद्गुरु नंदकुमार जाधव, सनातन संस्था