कर्णावती  येथे उद्वाहन कोसळून ७ कामगारांचा मृत्यू

इमारतीच्या ९व्या मजल्यावर काम चालू असतांना कामगार उद्वाहनातून साहित्य वरच्या मजल्यावर नेत होते. या वेळी ७ व्या मजल्यावर पोचताच उद्वाहन कोसळले.

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळल्याने ११ जणांचा मृत्यू

पूंछ येथे एक बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला, तर २९ जण घायाळ झाले. ही बस साविजान येथून हिमाचल प्रदेशच्या मंडी येथे जात असतांना हा अपघात घडला.

भाग्यनगर येथील उपाहारगृहाला लागलेल्या आगीमध्ये ८ जणांचा मृत्यू

पंतप्रधान मोदी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी यात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि घायाळांना ५० सहस्र  रुपयांचे साहाय्य घोषित केले.  

पालघर येथील ४ यात्रेकरूंचा उत्तराखंड येथे अपघातात मृत्यू !

अपघातात मनोर येथील जितेश लोखंडे, वसई येथील धर्मराज खाटेकर, पुरुषोत्तम खिलखुटी आणि दहिसर येथील शिवाजी बुधकर यांचा मृत्यू झाला, तर इतर दोघे घायाळ झाले.

देशात श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी १६ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ४ भावंडांसह ६ जणांचा बुडून मृत्यू झाला. महाराष्ट्रातील धुळ्यामध्ये एकाचा मृत्यू झाला.

पाटलीपुत्र येथे गंगानदीत नौकाची टक्कर होऊन पाण्यात पडलेल्या ५० जणांपैकी १२ जण बेपत्ता

पाटलीपुत्र येथे गंगानदीमध्ये २ नौकांमध्ये झालेल्या टक्करीमुळे त्या नौका उलटल्या. यामुळे नौकेतील जवळपास ५० जण पाण्यात पडले.

पालघर येथे टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू !

टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची भरधाव वेगातील कार पालघरमधील चारोटी येथे नदीवरील पुलाच्या कठड्याला आदळली. या अपघातात मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ८० टक्के अपघात मानवी चुकांमुळे !

मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी जनतेला शिस्त लावणे आवश्यक !

पिंपरी परिसरामध्ये ७ मासांमध्ये ७४६ अपघात; १७६ जणांचा मृत्यू !

जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम ! अजून किती अपघात आणि मृत्यू झाल्यानंतर प्रशासन रस्ते चांगले करणार आहे ?