नाशिक येथे धावत्या बसने पेट घेतल्याने १३ जणांचा मृत्यू !

संभाजीनगर रस्त्यावर ८ ऑक्टोबरच्या पहाटे डंपर-खासगी बस (चिंतामणी टॅव्हल्स) यांचा अपघात झाला. त्यानंतर बसने पेट घेतल्याने त्यात १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे.

जलपायगुडी येथे दुर्गादेवीच्या मूर्तींचे विसर्जन चालू असतांना पूर आल्याने १० जणांचा मृत्यू

अजून काही जण बेपत्ता असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून एका वैमानिकाचा मृत्यू !

तवांग येथे भारतीय सैन्याचे हेलिकॉप्टर ‘चित्ता’ कोसळल्याने झालेल्या अपघातात लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव या वैमानिकाचा मृत्यू झाला, तर अन्य एक वैमानिक घायाळ झाला.

उत्तराखंडमध्ये ५०० मीटर खोल दरीत बस कोसळल्याने २५ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.

उत्तरकाशीमधील शिखरावर झालेल्या हिमस्खलनामुळे १० जणांचा मृत्यू, तर १८ जण बेपत्ता

मृत आणि बेपत्ता असणारे सर्व जण उत्तरकाशीच्या नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंगच्या ट्रेकिंग ग्रूपचा भाग होते. यामध्ये ३३ प्रशिक्षणार्थी आणि ७ प्रशिक्षक यांचा समावेश होता.

भदोही (उत्तरप्रदेश) येथील दुर्गापूजा मंडपात आरती चालू असतांना लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू

मृतांमध्ये २ मुले आणि एक महिला यांचा समावेश आहे, अशी माहिती भदोहीचे जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी दिली.

कानपूर येथे ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात पडल्याने झालेल्या अपघातात २६ जणांचा मृत्यू

ट्रॅक्टरचा चालक दारू प्यायलेला होता !

पाकिस्तानमध्ये सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळून ६ सैन्याधिकारी ठार

‘द बलुचिस्तान पोस्ट’ या दैनिकाने ट्वीट करत ‘या अपघातामागे बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांचा हात आहेत’, असा दावा केला आहे.

बांगलादेशात नौका उलटून झालेल्या अपघातात २४ हिंदू भाविकांचा मृत्यू

या अपघाताच्या वेळी १० जणांना वाचवण्यात यश आले. या नौकेमधून ७० ते ८० जण प्रवास करत होते.

देवगड येथील अपघातग्रस्त नौकेतून तेलगळती : सिंधुदुर्गसह गोवा राज्यातील समुद्रकिनार्‍यांना धोका

तेलगळतीच्या पार्श्वभूमीवर तटरक्षक दलाकडून ‘ऑईल स्पील डीस्परसंट’ची फवारणी हेलिकॉप्टरमधून करण्यात आली आहे, तसेच येथे स्वच्छता पथकाकडूनही आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.