चेन्नईत ३० वर्षांनंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे २ जणांचा मृत्यू

चेन्नई (तमिळनाडू) – येथे १ नोव्हेंबर या दिवशी मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे झालेल्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला. उत्तर चेन्नईमध्ये विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एक महिला इमारतीखाली दबली गेल्याने तिला जीव गमवावा लागला.

तमिळनाडू सरकारने २ नोव्हेंबर या दिवशी चेन्नई, तिरुवल्लूर, रानीपेट जिल्ह्यांसह ७ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा केली. गेल्या ३० वर्षांत प्रथमच चेन्नईत १ नोव्हेंबरला एवढा पाऊस झाला. शहरात येत्या २४ घंट्यांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल आहे.