मध्यप्रदेशात बस आणि चारचाकीच्या भीषण अपघातात ११ ठार

बैतुल (मध्यप्रदेश) – राज्यातील बैतुल-अमरावती राज्य महामार्गावर ३ एप्रिलच्या उत्तररात्री रिकामी प्रवासी बस आणि ‘तवेरा’ चारचाकी गाडी यांचा भीषण अपघात झाला. यात चारचाकीतील ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ पुरुष, ३ महिला आणि २ लहान मुले यांचा समावेश आहे. अपघातात बचावलेल्या चारचाकीच्या चालकाने पोलिसांना सांगितले की, त्याला डुलकी लागली होती. त्यामुळे त्याची गाडी थेट बसला धडकली.