अमेरिकेत लढाऊ विमानांची धडक, ६ ठार !

ऑस्टिन (अमेरिका) – अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डलास शहरात १२ नोव्हेंबर या दिवशी हवाई प्रात्यक्षिकांच्या वेळी दोन लढाऊ विमानांची हवेत धडक झाली. यामध्ये ६ जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही लढाऊ विमाने दुसर्‍या महायुद्धातील आहेत. या अपघाताचे प्रत्यक्ष चित्रीकरण सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे.