वारकर्‍यांनी सूर्याेदय ते सूर्यास्तापर्यंतच चालावे ! – शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक 

अपघात टाळण्याविषयी प्रतिबंधात्मक सूचना

शिरीष सरदेशपांडे

सोलापूर – जुनोनी येथे वारकर्‍यांच्या दिंडीमध्ये चारचाकी घुसल्याने ७ जण ठार झाले आहेत. कार्तिकी वारीसाठी पायी जाणार्‍या वारकर्‍यांनी सूर्याेदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच चालावे. रात्रीच्या वेळी विश्रांती घ्यावी. त्यामुळे अपघातांचे प्रमाण न्यून होईल, असे आवाहन नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी केले आहे.

वारीमधील अपघात हे रात्री आणि पहाटेच्या वेळी अधिक प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे सरदेशपांडे यांच्या आदेशानुसार दिंडी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच प्रत्येक तालुक्यातील त्या-त्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी वारी मार्गावर सातत्याने गस्त घालतील. ‘सुरक्षिततेसाठी रस्त्यावरील पांढर्‍या रंगाच्या पट्ट्यांच्या खालून वारकर्‍यांनी चालावे’, असेही पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.