लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील ‘स्पेक्टर केमिकल’ला आग

आस्थापनाच्या बाहेर ठेवण्यात आलेल्या पिंपामधील पदार्थाने अचानक पेट घेतला. त्यानंतर बाजूच्या सर्वच पिंपाना आग लागली.

बिहारमध्ये पोलिसांनी अपघातग्रस्त व्यक्तीचा मृतदेह पुलावरून खाली थेट ओढ्यात फेकून दिला !

अशांना पोलीस म्हणावे कि कसाई ? अशा पोलिसांना अटक करून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !

बेंगळुरूत फटाक्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत १४ जणांचा मृत्यू  

दसरा आणि दिवाळी यांसाठी फटाक्यांची साठवणूक करण्यात येत होती. वाहनातून खोकी उतरवत असतांना त्यांना आग लागली. काही वेळातच दुकान आणि गोदाम यांना आगीने वेढले.

कॅनडामध्ये विमान कोसळून झालेल्या अपघातात मुंबईच्या प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू

अभय गडरु आणि यश विजय रामुगडे अशी त्यांची नावे आहेत. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

गोव्यात ९ मासांत झालेल्या २ सहस्र ९० अपघातांत २१० जणांनी गमावले प्राण

आकडेवारीनुसार राज्यात दिवसाला सरासरी ८ अपघात होतात, तर प्रत्येक ३१ घंट्यांत एकाचा अपघातामुळे मृत्यू होत असतो.

नाशिक येथील ६ तरुणांचे डोळे भाजले; मुंबई, ठाणे, धुळे येथेही घटना !

श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीतील ‘लेझर लाईट’मुळे डोळे गमावण्याची वेळ !

पावसाने झोडपले : नद्यांना उधाण, कोकण रेल्वे सेवा ठप्प

गोवा राज्यात आणि शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार पाऊस सलग दुसर्‍या दिवशीही चालूच होता. जोरदार वारे आणि पाऊस यांच्यामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली आणि वीजपुरवठा खंडित झाला. संक्षिप्त वृत्तांत देत आहोत.

जयपूर (राजस्थान) येथे २ दुचाकीस्वारांमधील अपघातानंतर जमावाने एका दुचाकीस्वाराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू

दोन दुचाकींमध्ये टक्कर झाल्यानंतर जमावाने यांतील एका दुचाकीस्वाराला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वादळी वार्‍यासह पावसाने गोव्याला झोडपले : जनजीवन विस्कळीत !

अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याचे प्रकार घडल्याने संबंधित भागातील वीजपुरवठा खंडित ! दक्षिण कोकण आणि गोव्याची किनारपट्टी या भागांत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १ ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीची चेतावणी हवामान विभागाने दिली आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) येथे झाड पडून २ युवकांचा जागीच मृत्यू

‘अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी शहर आणि परिसरातील धोकादायक स्थितींविषयी प्रशासनाला वेळोवेळी जाणीव करून दिली जाते; मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करते.’’