लेह (लडाख) – लडाखमधील दौलत बेग ओल्डी भागात नदी ओलांडण्याच्या सरावाच्या वेळी झालेल्या अपघातामध्ये ५ सैनिकांचा मृत्यू झाला. के. रेड्डी, भूपेंद्र नेगी, अकदुम तयबम, ए. खान आणि नागराज पी. अशी त्यांची नावे आहेत. ‘टी-७२’ रणगाडा नदी ओलांडत असतांना अचानक नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने हा अपघात झाला. ही घटना रात्री १ वाजता घडली. रणगाड्यातील सैनिकांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत. टी-७२ रणगाड्यामध्ये ३ जण असतात; मात्र सराव चालू असतांना त्यात ५ सैनिक होते. हा रणगाडा ५ मीटर (१६.४ फूट) खोलपर्यंत नद्या पार करण्यास सक्षम आहे.

ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या मालवाहू वाहनांचे परवाने कायमचे रहित करणार ! – प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court