Delhi Rain : देहलीत पडलेल्या मुसळधार पावसाचा आम्हाला अंदाज वर्तवता आला नाही ! – हवामान विभागाची स्वीकृती

नवी देहली – देहलीत २७ आणि २८ जून या दोन  दिवसांत मुसळधार पाऊस पडला. गेल्या ८८ वर्षांचा पावसाचा विक्रम याद्वारे मोडला गेला. या पावसामुळे अनेक ठिकाणी ४ ते ५ फूट पाणी साचले होते. पावसामुळे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ‘टर्मिनल-१’ येथील वाहनतळ क्षेत्राचे छत आणि आधार खांब कोसळले. त्याखाली अनेक गाड्या दबल्या गेल्या. यात एकाचा मृत्यू झाला, तर ८ जण घायाळ झाले. या पावसाविषयी हवामान विभागाने म्हटले की, आम्हाला या पावसाचा अंदाज वर्तवता आला नाही.

संपादकीय भूमिका

  • हवामान खात्याने ‘पाऊस पडणार नाही’, असा अंदाज वर्तवल्यावर ‘लोकांनी बाहेर पाडतांना छत्री किंवा रेनकोट घेऊन जावे’, असे हमखास म्हटले जाते. ते आजही तितकेच सत्य असणे, हे हवामान विभागाला लज्जास्पद आहे !
  • ज्योतिषांनी वर्तवलेल्या भाकितांवर कायम टीका करणारे पुरोगामी आणि विज्ञानवादी यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?