पत्रकार बचावले !
नागपूर – भंडारा वैनगंगा नदीच्या पात्रावरील गोसीखुर्द धरणाच्या बॅक वॉटरवर जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प साकारला जात आहे. भंडारा आणि नागपूर येथील सीमेवरच त्याची उभारणी होत आहे. या प्रकल्पाचा १०२ कोटी रुपयांचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या पहिल्या टप्प्याचे भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या वेळी जलपर्यटनाच्या भूमीपूजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमवेत जाणारी पत्रकारांची बोट कलंडली. बोटीचा समोरचा भाग पाण्यात बुडल्याने बोट बुडू लागली; मात्र वेळेवर बचाव पथकाचे साहाय्य मिळाल्याने सर्वांची सुखरूप सुटका झाली. या बोटीमध्ये पत्रकार आणि पर्यटन अन् जलसंपदा विभागाचे काही कर्मचारी यांच्या एकूण १० ते १२ जण होते.