नाशिक येथे महिलेचे बळजोरीने धर्मांतर ! – भाजपच्‍या नेत्‍या चित्रा वाघ

लव्‍ह जिहाद आणि धर्मांतर यांच्‍या विरोधात कायदा करण्‍यासाठी राज्‍यात प्रचंड मोठे मोर्चे अन् आंदोलने होत असूनही त्‍याच्‍याविषयी कायदे करण्‍यात दिरंगाई होत आहे, हेच सत्‍य आहे !

नगर येथील साकूर भागात भुताटकीच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर !

हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासह देशात कठोर धर्मांतरबंदी कायदा लागू करणे आवश्यक आहे. तसेच बळजोरीने किंवा आमीष दाखवून धर्मांतर करणार्‍यांना कठोर शिक्षा होणेही तितकेच आवश्यक आहे.

सर्व समस्‍यांवर एकमेव उपाय : हिंदु राष्‍ट्र ! – सुनील घनवट,  राज्‍य संघटक, हिंदु जनजागृती समिती

दोंडाईचा (धुळे) येथील हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत हिंदु एकजुटीचा अविष्‍कार ! या सभेला २ सहस्र ५०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्‍थित होते.

नाशिक येथे धर्मांतराचे आमीष दाखवून महिलेवर सामूहिक अत्‍याचार !

धर्मांतराच्‍या आमीषाखाली महिलेवर सामूहिक अत्‍याचार करणार्‍या सर्व नराधमांना मृत्‍यूदंडाची शिक्षा दिली पाहिजे. अशा नराधमांमुळेच समाजातील महिलेवर अत्‍याचारांचे प्रमाण वाढले आहे.

हरिद्वार येथे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी विवाह करणार्‍या अझर याला अटक !

ज्‍या वेळी महिलेने याविषयी अझर याला जाब विचारला, त्‍या वेळी त्‍याने तिच्‍यावर धर्मांतर करण्‍यासाठी दबाव आणला. धर्मांतर न केल्‍यास हत्‍या करण्‍याची धमकीही अझर याने दिली.

मुंबईतील हिंदु जनआक्रोश मोर्च्‍यात भडकावणारी वक्‍तव्‍ये केली जाणार नाहीत, याची निश्‍चिती करा !

महाराष्‍ट्रभरात हिंदु जनआक्रोश मोर्चे हे लव्‍ह जिहाद, हिंदूंचे धर्मांतर आदी आघातांच्‍या विरोधात होत असून त्‍या माध्‍यमातून लक्षावधी हिंदू एकवटले आहेत. सिब्‍बल यांचा यास विरोध असणे, यातूनच काँग्रेसचा हिंदुद्वेष्‍टेपणा उघड होतो !

धर्मांतर बंदी कायदा कधी ?

आळंदीसारख्‍या पवित्र ‘तीर्थस्‍थळी’ गेल्‍या काही दिवसांपासून ख्रिस्‍ती मिशनर्‍यांकडून हिंदूंना विविध आमिषे दाखवून धर्मांतरासाठी उद्युक्‍त केले जात आहे.

(म्‍हणे) ‘ख्रिस्‍ती धर्मगुरूंना मारहाण, त्‍यांच्‍यावरील धर्मांतराचे खोटे आरोप थांबवा !’

आरोप सिद्ध होण्‍याच्‍या अगोदरच ‘खोटे आरोप’, असे कसे काय म्‍हणता येईल ? धर्मांतर करतांना अनेक ख्रिस्‍ती धर्मगुरूंना पकडले आहे, अनेकांनी धर्मांतर केल्‍याचे मान्‍यही केले आहे.

धर्मांतराच्‍या विरोधात उत्तरप्रदेश उच्‍च न्‍यायालयाची कठोर भूमिका !

तक्रारदार हिमांशू दीक्षित यांनी सांगितले की, ‘मिशन हॉस्‍पिटल’मध्‍ये भरती होणार्‍या भोळ्‍याभाबड्या रुग्‍णांना ‘आजार बरे करणे, मुलांना चांगल्‍या शाळेत अन् चांगल्‍या प्रकारचे शिक्षण विनामूल्‍य देणे, आर्थिक साहाय्‍य करणे, तसेच त्‍यांच्‍या कुटुंबातील काही व्‍यक्‍तींना नोकर्‍या देणे’, अशा प्रकारची प्रलोभने दाखवण्‍यात आली होती.

सक्तीचे धर्मांतर आणि सर्वाेच्च न्यायालयाने घेतलेला पवित्रा !

सामूहिक आणि वैयक्तिक धर्मांतरेही झाली आहेत. आता मात्र ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली फसवणूक आणि धर्मांतर होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला ‘सक्तीच्या धर्मांतराविषयी काहीच का करत नाही ?’, असा केलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे.