बांदा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

बांदा (उत्तरप्रदेश) – येथे बाजारात गेलेल्या एका अल्पवयीन हिंदु मुलीला धर्मांधांनी मादक पदार्थाचा वास देऊन बेशुद्ध करून, तसेच तिचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यासह तिच्यावर धर्मांतर आणि विवाह करण्याचाही दबाव आणण्यात आला. या प्रकरणी पोलीस गुड्डू मुस्लिम आणि त्याचे अन्य साथीदार यांचा शोध घेत आहे. गुड्डू मुस्लिम याने पीडितेला सुरत येथील एक सदनिकेत घेऊन गेला आणि तेथे त्याने अन् त्याच्या साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. एके दिवशी पीडितेला संधी मिळताच तिने आईशी संपर्क साधून घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांच्या साहाय्याने तिची सुटका करण्यात आली.

संपादकीय भूमिका

लव्ह जिहादविरोधी कायद्यालाही धर्मांध जुमानत नाहीत, हे लक्षात घेऊन आता सरकारने या कायद्यात फाशीसारख्या कठोर कलमांचा समावेश केला पाहिजे !