झारखंडमधील ‘मॉडेलिंग’ प्रशिक्षक अख्‍तर याच्‍याविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा नोंद !

बनावट नाव धारण करून हिंदु महिला मॉडेलची फसवणूक !

(‘मॉडेल’ म्‍हणजे आस्‍थापनाने बनवलेले कपडे अथवा वस्‍तू यांचा प्रसार करण्‍यासाठी नियुक्‍त केलेली व्‍यक्‍ती.)

रांची (झारखंड) – येथील मॉडेलिंग प्रशिक्षण केंद्राचा संचालक तन्‍वीर अख्‍तर याने बलात्‍कार केल्‍याचा आरोप एका महिला हिंदु मॉडेलने केला. पीडित महिला बिहारमधील भागलपूर येथील रहिवासी आहे. तिने वर्ष २०२० मध्‍ये रांचीतील ‘यश मॉडेलिंग स्‍कूल’मध्‍ये प्रवेश घेतला. तेथे ती कामही करत होती. तेथे तिला तन्‍वीरमुळे दीड वर्षे मानसिक त्रास झाला. पुढे ती कामानिमित्त मुंबईत आली. तेथेही तन्‍वीर तिला त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने ३० मे या दिवशी मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्‍यात तन्‍वीरविरुद्ध तक्रार प्रविष्‍ट केली. त्‍यानुसार पोलिसांनी तन्‍वीरविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा नोंदवून या प्रकरणाची माहिती झारखंड पोलिसांना दिली.

यासंदर्भात पीडितेने प्रसारित केलेल्‍या व्‍हिडिओत म्‍हटले आहे की, तन्‍वीरने स्‍वत:चे नाव यश असल्‍याचे सांगून माझी फसवणूक केली. त्‍याला माझे धर्मांतर करून माझ्‍याशी विवाह करायचा आहे. तन्‍वीरने मुंबईत येऊन माझा जीव घेण्‍याचाही प्रयत्न केला. तन्‍वीरने माझ्‍या काढलेल्‍या छायाचित्रांचा अपवापर केला. मी याआधीही त्‍याच्‍या विरोधात तक्रार केली होती; तेव्‍हा त्‍याने न्‍यायालयात प्रतिज्ञापत्रा देऊन ‘यापुढे मी असे करणार नाही’, अशी स्‍वीकृती दिली होती; परंतु आताही तो त्रास देतच आहे. तो मला अश्‍लील संदेश पाठवत असतो. दुसरीकडे तन्‍वीरने आरोप केला आहे की, ‘सदर महिलेमुळे मला व्‍यवसायात हानी झाली. मी तिच्‍याकडे पैसे मागितले असता मी लव्‍ह जिहाद केल्‍याचा आरोप ती करत आहे.’

मी मरीन, पण माझा धर्म पालटणार नाही ! – पीडित महिला

पीडित महिलेने व्‍हिडिओमध्‍ये म्‍हटले आहे, ‘मी मरीन, पण माझा धर्म पालटणार नाही. पंतप्रधान आणि मुख्‍यमंत्री यांनी मला या राक्षसापासून वाचवावे. उद्या तो काय करेल, हे मला ठाऊक नाही. मी हिंदू आहे, मी धर्म पालटणार नाही. मुसलमानांशी कधीही लग्‍न करू नका.’

संपादकीय भूमिका

लव्ह जिहाद रोखण्यासाठी सरकारने फाशीच्या शिक्षेची तरतूद असणारा कायदा करणे आवश्यक आहे !