२ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी महावितरणचे कार्यकारी अभियंता कह्यात !
भ्रष्टाचाराने पोखरलेली ही व्यवस्था सुरळीत होण्यासाठी अशाच कारवाईची आवश्यकता आहे.
भ्रष्टाचाराने पोखरलेली ही व्यवस्था सुरळीत होण्यासाठी अशाच कारवाईची आवश्यकता आहे.
हिंदु जनजागृती समितीने यंदा दीपावलीच्या पार्श्वभूमीवर हलाल प्रमाणित उत्पादनांच्या विरोधात अभियान आरंभले आहे. या अंतर्गत समितीच्या शिष्टमंडळाने नुकतीच कोल्हापूर जिल्ह्यात विविध आस्थापनांना भेटी देऊन या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.
१० सहस्र बेकायदेशीर बांधकामे झाली आहेत, ती होत असतांना तुम्ही काय करत होतात ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने नवी मुंबई महापालिकेला विचारला आहे. येथील बेकायदेशीर बांधकामांच्या विरोधात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे.
हॉटेलचे मालक श्री. उदय पाराळे, तसेच व्यवस्थापक श्री. अमित सावंत यांच्यासह एकूण २२ कर्मचारी यात सहभागी झाले होते. शिबिराचे उद्घाटन श्री. अमित सावंत यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
नियमबाह्य आणि अनधिकृत पद्धतीने पाणीपुरवठा करणारी नळ जोडणी करणार्या सर्व जणांवर फौजदारी गुन्हे नोंद करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना नुकत्याच दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
बांधकाम प्रकल्पासाठी तकलादू पद्धतीने उभारण्यात आलेली पाण्याची टाकी कामगारांवर कोसळली. यात ५ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर १५ कामगार घायाळ झाले. टाकीच्या ढिगार्याखाली अनेक जण अडकल्याची प्राथमिक माहिती आहे.
विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ पिस्तुल आणि जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी ऋषिकेश कुंभार या युवकास त्याच्याकडे पिस्तुल बाळगण्याचा परवाना नसल्यामुळे पोलिसांनी अटक केली आहे.
शहरातील रस्त्यांची दुरवस्था पहाता वेळोवेळी सूचना देऊनही रस्त्यांविषयी कोणताही अहवाल आयुक्त कार्यालयात प्राप्त न झाल्याने प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी विविध अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावल्या आहेत.
‘भारतीय जनता पक्षा’चे लोकसभा निवडणूक सहप्रमुख रामचंद्र घरत यांची पुन्हा नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सांगली येथील भाजपचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ हे २४ ऑक्टोबर या दिवशी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर त्यांचे उमेदवारी आवेदन प्रविष्ट करणार आहेत.