शनिशिंगणापूर (अहिल्यानगर) येथे मंदिराच्या पश्चिमेला नवे प्रवेशद्वार ! 

शनिशिंगणापूरला भुयारी दर्शन महाद्वाराकडे जाण्यासाठी आता देवस्थान वाहनतळालाच मंदिराच्या पश्चिम दिशेला नवीन प्रवेशद्वाराचे बांधकाम चालू आहे. यामुळे शनिभक्तांचा थेट ‘भुयारी दर्शन महाद्वारा’त प्रवेश होऊ शकणार आहे.

सांगली येथे गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने आज भव्य मेळावा !

श्रीराममंदिर परिसरात असलेल्या जैन कच्छी भवन येथे हिंदु एकता आंदोलनाच्या वतीने ९ एप्रिलला सायंकाळी ५ वाजता हिंदूंचा भव्य मेळावा आयोजन करण्यात आला आहे.

‘सेट’ परीक्षेला दीड सहस्र परीक्षार्थी अनुपस्थित !

शहरातील २२ परीक्षा केंद्रांवर ८ सहस्र १०५ विद्यार्थ्यांनी ७ एप्रिल या दिवशी ‘सेट’ची परीक्षा दिली. यासाठी ९ सहस्र ६३० परीक्षार्थींनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात दीड सहस्र परीक्षार्थी अनुपस्थित राहिले. ८ सहस्र १३० जणांनी पेपर सोडवला.

१० एप्रिलपासून प.पू. डॉ. के.ब. हेडगेवार व्याख्यानमाला !

कोल्हापूर शहरात राष्ट्रीय विचारांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोचवण्यासाठी हिंदु व्यासपीठ प्रतिवर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक ‘प.पू. डॉ. के.ब. हेडगेवार’ व्याख्यानमाला आयोजित करते.

मद्य प्राशन करून मारहाण करणार्‍या मुलाची वडिलांकडून हत्या !

धर्मशिक्षणाच्या अभावी युवक व्यसनांना बळी पडतात. हे लक्षात घेऊन धर्मशिक्षण देणे आवश्यक !

नवी मुंबईतील बेलापूर-पेणधर मेट्रोच्या वेळेत वाढ !

बेलापूर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री ११ वाजता पेणधरच्या दिशेने रवाना होईल, तर पेणधर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता बेलापूरच्या दिशेने रवाना होईल.

‘आय.पी.एल.’च्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणार्‍या १२ जणांविरोधात पुणे येथे गुन्हा नोंद ! १० जणांना अटक, २ जण पसार !

त्यांच्याकडून ५८ सहस्र रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. ते बनावट बँक (अधिकोष) खाते उघडून क्रेडिट आणि डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे घेत होते, याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई केली.

चिखली (पिंपरी) परिसरातील १५० हून अधिक भंगाराची दुकाने आगीमध्ये जळाली !

आतातरी महापालिका अवैध भंगार दुकानांवर कारवाई करणार का ?

अकोला येथे अटकेतील गुंडाच्या साथीदाराकडून कारागृह निरीक्षकाला जिवे मारण्याची धमकी !

कुख्यात गुंड गजानन कांबळे याला कारागृहात भेटण्यासाठी आलेल्या त्याच्या साथीदारांनी कारागृह निरीक्षकालाच धमकी देत धक्काबुक्की केली.

कोकण रेल्वे मार्गावर उन्हाळी सुटीसाठी विशेष गाडीच्या फेर्‍या

कोकण रेल्वे मार्गावर सुट्यांचा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचुवेली दरम्यान २४ वेळा अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ११ एप्रिल २०२४ पासून या विशेष गाड्या चालू होतील.